अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | एक स्वयंसहाय्यता समूहामध्ये किती महिलांचा समावेश करू शकतो? |
एक स्वयंसहाय्यता समूहामध्ये १०-१२ महिलांचा समावेश करू शकतो
|
2
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | स्वयंसहाय्यता समूहामध्ये येण्यासाठी महिलेच्या वयाची अट किती? |
कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ६० वर्षे
|
3
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | किती महिने पूर्ण झाल्यानंतर स्वयंसहाय्यता समूहास फिरता निधी मिळतो? |
स्वयंसहाय्यता समूहास स्थापन झाल्यापासून तीन महिने पूर्ण झाले असतील तर त्यास फिरता निधी मिळतो
|
4
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | बँकेकडून समूहास पहिले कर्ज कमीत कमी किती रुपये मिळू शकते? |
१.५० लाख रुपये
|
5
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | ग्रामसंघ स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती समूह असणे गरजेचे आहे? |
गावामध्ये कमीत कमी ६ समूह चालू स्थितीत असणे गरजेचे आहे.
|
6
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | ग्रामसंघास किती रुपये व्यवस्थापन निधी प्राप्त होतो? |
एकूण ७५०००/- रुपये
|
7
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | व्यवसाय करण्यासाठी अभियानाकडून कोण कोणत्या योजनेमार्फत आर्थिक सहाय्य केले जाते? |
CIF, PMFME, MUDRA, PMFME 35%, स्टार सखी या योजनेमार्फत अर्थ सहाय्य केले जाते.
|
8
| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | समूहातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते का? |
होय, RSETI मार्फत व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते
|