**दिनांक:** 08 एप्रिल 2025
**विषय:** प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण
शिराळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचित करण्यात येते की, पंचायत समिती अंतर्गत **प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन** अंतर्गत पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण पुढील आठवड्यापासून संपूर्ण तालुक्यात सुरू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून बेघर, कच्ची घरे असणारे, भाड्याने राहणारे तसेच स्वतःचे पक्के घर नसणारे सर्व पात्र लाभार्थी यांची नवीन यादी तयार करण्यात येणार आहे.
**आवास प्लस सर्वेक्षण 2018** मध्ये प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले आणि सिस्टीमद्वारे अपात्र ठरलेले, परंतु सध्याच्या निकषांनुसार पात्र असणाऱ्या कुटुंबांचा या सर्वेक्षणात समावेश केला जाईल. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ यांनी सर्व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणाद्वारे पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी तयार करून त्यांना योजनेत सामावून घेण्याचे नियोजन आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व बेघर, कच्च्या घरात राहणारे, भाड्याच्या घरात वास्तव्य करणारे तसेच स्वतःचे पक्के घर नसणारे लाभार्थी यांनी आपली नावे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून नावनोंदणी करावी. नावनोंदणी केल्यानंतर सर्वेक्षणाद्वारे त्यांची पात्रता तपासून यादीत समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेऊन लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे आणि योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.