अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| शिक्षण विभाग | शिक्षण विभागाकडील समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना माहिती दया? |
ही योजना शाळांतील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे- - विहित नमुन्यातील अर्ज - आधार कार्ड झेरॉक्स - बँक पासबुक झेरॉक्स - उत्पन्नाचा दाखला - विद्यार्थ्यांचे गुणपत्रक - जातीचा दाखला - आधार संलग्न असले बाबतचा दाखला
|
2
| शिक्षण विभाग | शिक्षण विभागाकडील राजीव गांधी सानुग्रह योजना माहिती दया? |
जिल्हा परिषद शाळेतील एखादा विद्यार्थी अपघातात दगावला गेला तर त्यासाठी ही योजना राबविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे - एक नमुन्यातील अर्ज - मुख्याध्यापक शिफारस पत्र - पोस्टमार्टम रिपोर्ट - पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन कडील F.I.R
|
3
| शिक्षण विभाग | इयत्ता पहिली करिता 25% आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कशी असते? |
विनाअनुदित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 25 % आरक्षण असते. -लाभार्थी पात्र यादी 1. बिगर मागास प्रवर्ग यांच्याकरिता एक लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेले. 2. मागास प्रवर्गासाठी जातीचा दाखला आवश्यक 3. 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले विद्यार्थी
|
4
| शिक्षण विभाग | शिक्षण विभागाकडील शालेय पोषण आहार योजना कोणासाठी असते व ती कशी राबवली जाते? |
इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मध्यान भोजन योजना राबवली जाते. ही योजना सन 1995 96 रोजी सुरू झालेले आहे.
|
5
| शिक्षण विभाग | शालेय पोषण आहार योजनेचे स्वरूप व याची उद्दिष्टे काय आहेत? |
शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार आहार बनवून दिला जातो तसेच प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. - योजनेची उद्दिष्टे 1. देशातील मुलांना पोषक आहार मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे 2. या योजनेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या पुरवठा द्वारा मार्फत तांदूळ व धान्यदि मालाचा शाळांना पुरवठा केला जातो . 3. सदर आहार शिजवून देण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस ( शासन नियुक्त ) मार्फत शाळेत आहार तयार करून नियमित मध्यन्ह भोजना वेळी दिला जातो
|