1 . |
योजनेबद्दल माहिती |
मार्गदर्शक सूचना : - महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक :- स्वभाभम२०21/प्र.क्र.272 /पापु- १६, मंत्रालय, मंबुई ४०० ०३२. दिनांक ०२ डिसेंबर २०२१ . पाणी व स्वच्छता विभाग,शासन निर्णय क्र.संस्वअ २०१० /प्र.क्र.२४३/पापु १६,दिनांक ०३ जानेवारी,२०११ व क्र.स्वभमि ०१२ /प्र.क्र. २७३/पापु,१६,दिनांक २१ ऑगस्ट,२०१३ हे दोन शासन निर्णय अधिक्रमित करून,राज्यातील ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबबत,मार्गदर्शक सुचनाशासन निर्णय क्रमांक स्वभामि२०१९/प्र.क्र.१४१/पापु १६ तसेच शासन परिपत्रक क्रमांक स्वभामि२०२०/प्र.क्र ११६/पापु १६ मध्ये निर्गमीत केलेल्या आहेत.केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ (ग्रामीण)संदर्भांधीन नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या घटकाचा समावेश केला आहे.
विषयाधीन घटकासाठी ,लोकसंख्या आधारित अर्थसहाय्य अनुज्ञेय असून,यासाठी केंद्र व राज्याचा अर्थसह्याचा हिस्सा ६०:४० या प्रमाणात आहे.यामध्ये लाभार्थी ग्रामपंचायतीचा हिस्सा नीरंक आहे.
केंद्र शासनाने माहे जुलै,२०२० च्या मार्गदर्शक सूचनान्वये,या टप्प्यात घ्यावयाच्या काही कामाकरीता १५ वा वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीना मिळणारा निधी,नरेगा वा इतर निधी स्रोताच्या कृतीसंगमातून घ्यावयाचा आहे.
तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प नियोजन यासाठी व्यावसायिक संस्था/स्वयंसेवी संस्था यांचा समावेश सर्वेक्षण करणे,अंदाजपत्रकीय प्रस्ताव तयार करणे,आराखडे तयार करणे व तांत्रिक सल्ला/सहाय्य प्रदान करणे यासाठी करणे सुचविले आहे.
संपूर्ण स्वच्छता अभियानात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्व स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.अभियानाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की,पूर्वी स्वच्छतेची संकल्पना मानवी विष्ठेच्या विविध पद्धतीने करावयाच्या विल्हेवाटीपुरती मर्यादित होती.
तथापि,आता या संदर्भात व्यापक संकल्पनेचा स्वीकार केला गेला आहे.ज्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,सुरक्षित अन्न,वैयक्तिक व घरगुती आणि पर्यावरणीय स्वच्छता या घटकांचा समावेश आहे.
स्वच्छता हि केवळ सामान्य आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची नसून वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातही तिचे अनन्य साधारण महत्व आहे.
जीवनमानाचा दर्जा आणि मानवी विकास निर्देशांक ठरविण्याच्या मुलभूत घटकात स्वच्छतेचा समावेश होतो.
स्वच्छता विषयक योग्य सवयीच्या माध्यमातून पाणी आणि मातीचे प्रदूषण टाळता येते.
स्वच्छता विषयक योग्य सवयीच्या माध्यमातून पाणी आणि मातीचे प्रदूषण टाळता येते.ज्याद्वारे रोगांना प्रतिबंध करता येतो.या पाश्वर्भूमीवर वैयक्तिक स्वच्छता,घरगुती स्वच्छता,स्वच्छ व सुरक्षित पाणी,घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन आणि मानवी विष्टेचे व्यवस्थापन या सर्व घटकांचा समावेश करून स्वच्छता संकल्पनेची व्याप्ती वाढविण्यात आले आहे.
नमूद स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)-टप्पा-२ मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे- गावाची लोकसंख्या घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन ५००० पेक्षाकमी रु.६०प्रती माणसी रु.२८०माणसी ५००० पेक्षा जास्त रु.४५माणसी रु. ६६०माणसी सांडपाणी व घनकचऱ्याचे संकलन,परिवहन आणि सुरक्षित व योग्य विल्हेवाट म्हणजेच सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन,मानवी जीवनामध्ये दैनदिन निर्माण होणाऱ्या सांडपाणी व घनकचऱ्याचा आरोग्य व पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून शास्त्रोक्त योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. याकरिता कचरा व सांडपाणी याकडे एक साधन संपत्ती या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. या साठी खालील महत्वाचे मुद्दे समजून घेणे उपयुक्त आहे.
अ)कमी वापर (Reduce)- Reduce/Minimisation म्हणजेच दैनदिन वस्तूचा कमीत कमी वापर करणे.उदा.प्लास्टिक,प्लास्टिक हि अविघटनशील वस्तू आहे.प्लास्टिक वापराची सध्याची व्याप्ती लक्षात घेता,त्याचे पुन्रचक्रीकरण करण्याचे,उपलब्ध असलेले तांत्रिक व आर्थिक उपाय किफायतशीर नाहीत.अशा वस्तूचा किमान वापर करणे, त्यापासून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण कमी करणे व अशा वस्तू वापराबाबत,ग्रामस्थांच्या वर्तुणुकीमध्ये बदल गरजेचे आहे.
ब) पुनर्वापर(Reduce)- पुनर्वापर होण्यासारख्या वस्तूचा वापर करून,घनकचऱ्याची निर्मिती किमान होईल,याची दक्षता घ्यावी.त्यामुळे नवीन वस्तूंची मागणी कमी होईल व पर्यायाने कचरा कमी होईल.
क) पुनर्चक्रीक्ररण (Recycle) कोणत्याही निरुपयोगी वस्तूचे भौतिक अथवा रासायनिक पद्धतीने विघटन करून,त्यावर प्रक्रिया करणे व नवीन वस्तूची निर्मिती करणे म्हणजे पुन्रचक्रीकरण(Recycleling), पुन्रचक्रीकरण यामध्ये दोन पद्धती येतात सायकलिंग अपसायकलिंग म्हणजे,जुन्या वस्तूचे त्याच्या पूर्वीच्या मूल्यापेक्षा अधिक मूल्याची वस्तू निर्माण करणे.डाऊन सायकलिंग म्हणजे,जुन्या वस्तूचे त्याच्या पूर्वीच्या मूल्यापेक्षा कमी मूल्याची वस्तू निर्माण करणे.
ड) पूनर्प्राप्ती (Recovery)- पूनर्प्राप्ती म्हणजे निरुपयोगी कचऱ्यापासून उर्जा निर्मिती करणे. जसे विघटनशील (Degradable) कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती व निरुपयोगी प्लास्टिक पासून इंधन निर्मिती करणे होय.याकरिता जमा केलेला निरुपयोगी प्लास्टिक कचरा PRO (producer responsibility organization)/जिल्हा अथवा तालुका स्तरीय प्लास्टिक वेस्ट मँनेजमेंट युनिट कडे शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे देणे आवश्यक आहे.
१)भौतिक घटकांनुसार कचऱ्याचे वर्गीकरण प्रमाणे केले जाते – घनकचरा घरात,व्यवसायात,उद्योगात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वस्तू ज्याची शून्य किंमत असून त्याने या वस्तूंना कचरा असे संबोधले आहे.मानवी विष्ठा,मुत्र आणि सांडपाणी वगळून सर्व उर्वरित कचऱ्यास घनकचरा असे म्हणतात. जैव विघटनशीलतेच्या आधारे आणि अंतिम विल्हेवाटीच्या पद्धतीनुसार घनकचऱ्याचे वर्गीकरण जैव विघटनशील असा कचरा जो जीवशात्रीय प्रक्रियेद्वारे पूर्णपणे विघटीत होऊ शकतो.त्यासाठी हवा उपलब्ध असली किंवा नसली तरी चालू शकते.स्वयंपाक घरातील कचरा,जनावरांचे शेण,शेतातील कचरा इ. अजैव विघटनशील जीवशात्रीय प्रक्रियेद्वारे ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकत नाही असा कचरा.या कचऱ्याचे पुनर्वापरयोग्य व अयोग्य असे दोन प्रकार आहेत. पुनर्वापर योग्य असा कचरा ज्याला आर्थिक मूल्य आहे पण ज्याची विल्हेवाट लावायची आहे आणि जो त्याच्यामधील उर्जामुल्याच्या सहाय्याने उदा.प्लास्टिक,कागद,कपडा इ. पुनर्वापरास अयोग्य असा कचरा ज्याला आर्थिक मूल्य नाही आणि ज्यातून काहीच निघत नाही.उदा.कार्बन,थर्माकोल,टेट्रापँक इ.
२) ग्रामीण भागात आढळणारा जैव विघटनशील व अजैवीक कचरा जैव विघटनशील कचरा अजैवीक विघटनशील कचरा ▪ भाज्या आणि फळाचा उरलेला भाग,केळीची पाने,नारळाच्या करवंटया,अंड्याचीटरफले,वाळलेली फुले,फांद्या इ. ▪ मांसाहारी कचरा (प्राण्यांची हाडे,कोंबडीचे पंख इ.) ▪ स्वयंपाक घरातील कचरा ▪ राख आणि कोळसा ▪ चहा,कॉफी पावडर ▪ झाडलोटीचा कचरा ▪ अन्नधान्य स्वच्छ करताना निर्माण होणारा कचरा इ. ▪ कागद : वह्या ,पुस्तके,वर्तमान पत्रे,पुठठे ▪ प्लास्टिक : केरीबँग,वस्तूची खोकी,दुधाच्या पिशव्या,तुटलेली प्लास्टिक भांडी,पाण्याच्या बाटल्या,रिकाम्या टूथपेस्ट इ. ▪ धातू : निकामी लोखंड,तांबे आणि स्टील ▪ औषधी गोळ्याची वेस्टणे,अन्नपदार्थासाठी वापरली जाणारी अल्युमिनियमची वेष्टणे ▪ काच : बाटल्या आणि काचेचे तुकडे ▪ लाकूड ,कपडा ▪ चमडा : तुटलेला चपला आणि बँग्स ▪ रबर :स्लीपर्स ▪ विद्युत वायर,खराब झालेल्या बँटऱ्या व बल्ब आणि इलेक्ट्रॉनिक कचरा इ.
३) सांडपाणीवर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते सांडपाणी वापरलेल्या आणि आवश्यकता नसलेल्या पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.रंग,उगमस्थान आणि विषाणूंचे प्रमाण या आधारे सांडपाण्याचे दुषित आणि सांडपाणी असे दोन प्रकार पडतात. दुषित पाणी (black water)स्वच्छता घर,शौचालय येणारे पाणी.अशा पाण्यातील रोगजंतूचे प्रमाण अधिक असते. सांडपाणी (grey water)स्वयंपाक घर,स्नानगृह,कपडे धुणे यातून येणाऱ्या पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.अशा पाण्यात रोगजंतूचे प्रमाण तुलनेने कमी असते. शासन परिपत्रक क्रमांक स्वभामि क्रमांक २०२०/प्र.क्र.११६ पापु नुसार,विवरणपत्र ड अंदाजपत्रक आराखडयामध्ये समावेश करावयाच्या घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन उपाययोजना तथा स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)-टप्पा-२ इतर कृती संगमामधून(Convergence) हाती घ्यावयाच्या उपांगांचा तपशील दिलेला आहे. |