अं.क्र. | विभाग | प्रश्न | उत्तर |
1
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी कोण पात्र आहे? |
लाभार्थी महिला गर्भवती असावी व तिचे वय कमीत कमी १९ वर्षे पूर्ण असावे . सदर योजनेत पहिल्या जिवंत अपत्यासाठी रक्कम रु ५००० लागू आहेत. तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर रक्कम रु ६००० इतका लाभ मिळतो. वेतनासह मातृत्व लाभ मिळणाऱ्या महिलांना व प्रति वर्ष कुटुंबाचे ८ लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे. अशा महिला या योजनेस पात्र नाहीत
|
2
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | जननी सुरक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे? |
सदर योजना ही गर्भवतीमहिला व 19 वर्षं वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांन साठी लागू आहे.बीपीएल श्रेणीत येणाऱ्या महिलाच या योजनेसाठी पात्र आहेत. शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभ घेऊ शकतात. ग्रामीण साठी नॉर्मल प्रसूती र.रु.७०० सिजेरीयन करता र.रु. १५०० व शहरीसाठी नॉर्मल प्रसूती र.रु.६०० सिजेरीयन करता र.रु.१५०० असा लाभ मिळतो.
|
3
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) यांच्याबद्दलची माहिती? |
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी (PMJAY) योजना ही सर्व रेशन कार्ड धारक यांना लागू केली आहे.या योजने अंतर्गत प्रति वर्ष र.रु ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील १ किवा सर्व सदस्य वापरू शकतात.योजनेतील सेवा सर्व सार्वजनिक रुग्णालये आणि पॅनेल केलेल्या खाजगी आरोग्य सेवा सुविधांमध्ये मिळू शकतात. या योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड असणे बंधनकारक आहे .
|
4
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | लसीकरण का करावे? |
लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी होते किंवा काही आजार टाळले जातात. लसीकरणामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. लसीकरणामुळे समुदायाचे रक्षण होते.
|
5
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | आभा कार्डचे फायदे काय आहेत? |
आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती ऑनलाईन नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो.
|
6
| तालुका आरोग्य कार्यालय विभाग | हेल्पलाईन क्रमांक काय आहेत? |
102हा क्रमांक गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी वापरला जातो. या क्रमांकावर कॉल केल्यानंतर, केंद्रीय संपर्क कक्षात जोडले जाते.
108 हा आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांसाठीचा दूरध्वनी क्रमांक आहे. हा क्रमांक देशभरात मोफत उपलब्ध आहे. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ताबडतोब वैद्यकीय वाहतूक मिळण्यासाठी हा क्रमांक तुम्ही कॉल करू शकता.
|