छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या प्रचितगड हे तालुक्याचे शेवटचे टोक असून या गडावरून एकाच वेळी कोकण किनारपट्टी व देशावर लक्ष ठेवण्याचे ठिकाण होते. या प्रचितीगडावरून वारणा हि नदी उगम पावते. या नदीवर मातीचे वारणा धारण ३४.४० टी.एम. सी. चे असून त्यामधून ८ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. या तालुक्यात प्रसिद्ध असे चांदोली अभयारण्य असून यामध्ये विविध प्रकारचे हिंस्र पशुपक्षी आहेत. तालुक्यात मोरणा हा दुसरा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. चांदोली अभयारण्यात विविध प्रकारच्या वनऔषधी वनस्पती आहेत.
शिराळा पंचायत समिती लोकांना सोई सुविधा देणेसाठी नेहमीच अग्रही असते. तालुक्यात एकूण ९१ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडलेल्या आहेत. पंचायत समिती मार्फत शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचल्या जातात. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत यांचेवर नियंत्रण ठेवणेचे काम पंचायत समिती मार्फत केले जाते.
शिराळा तालुका भौगोलिकदृष्टया पश्चिम, दक्षिण, उत्तर, या तीन विभागात विभागाला असून दक्षिण भाग वारणा, मोरणा नद्यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. पश्चिम आणि उत्तर भाग हा डोंगराळ असून बहुतांश लोक कामधंद्यासाठी मुंबईस आहेत.
शिराळा तालुका हा महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामधील एक तालुका आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे शिराळा तालुका प्रसिद्ध आहे. शिराळा तालुका भौगोलिकदृष्टया पश्चिम, दक्षिण, उत्तर, या तीन विभागात विभागाला असून दक्षिण भाग वारणा, मोरणा नद्यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. पश्चिम आणि उत्तर भाग हा डोंगराळ असून बहुतांश लोक कामधंद्यासाठी मुंबईस आहेत.
शिराळा तालुक्यात निनाई सह साखर कारखाना करुंगली, विश्वास सह साखर कारखाना चिखली येथे आहेत तसेच मक्यावर प्रक्रिया करून उपपदार्थ निर्मितीचा सहकार तत्वावरील आशिया खंडातील पहिला प्रकल्प यशवंत ग्लुकोज सहकारी कारखाना पाडळी येथे आहे. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात,ऊस पिके हे प्रमुख पिक आहे, त्याच बरोबर दुग्ध पालन व्यवसाय देखील आहेत.
शिराळा तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळात बिळाशी येथे जंगल सत्याग्रहाची नोंद इतिहासात आहे. तालुक्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारची एक शाखा कार्यरत होती. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील लोकांची लपण्याची ठिकाणे पश्चिम भागात होती. त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरातून भक्तजण शिराळा येथे जिवंत नागाची पूजा पहाणेसाठी नागपंचमी दिवशी उपस्थित असतात. तसेच नवनाथापैकी गोरक्षनाथ यांचे भव्य मंदिर शिराळा येथे आहे. कुंभमेळ्यानंतर १५ दिवस सर्व साधूंचे वास्तव्य दर १२ वर्षानंतर असते.
अधिक वाचा >>